National Service Scheme (NSS)

Pro. Mokshada Naik

Pro. Suresh Rathod

 To give a constructive impetus to the vibrant energy of the youth, the Government of India started the National Service Scheme on 2nd October 1969.  The occasion was chosen as it was the birth centenary of Mahatma Gandhi. And most importantly, Anand Niketan is one of the very few but fortunate colleges in the country where the National Service Scheme was started from 1969 itself.

Anand Niketan College has a legacy of social service. And the seeds of this service are being instilled in the students of Anand Niketan College through the National Service Scheme. The NSS (National Service Scheme) unit of the college received the best unit award of the Maharashtra government in 1995 and again in 2006. The unit is toiling with the same energy and dedication till today.  In the previous three years ie from 2019 to 2022, NSS unit worked hard and successfully under the guidance of Program Officers Dr. Ranjana Lad and Dr. Narendra Patil, Aand from 2022, the volunteers of the National Service Scheme are successfully implementing various activities in the college and in the surrounding villages under the guidance of Programme Officers Prof. Mokshada Naik and Prof. Suresh Rathod.

 On behalf of the National Service Scheme, different types of health related programs are implemented in the college and in nearby villages. Awareness about the disease ‘AIDS’ is created through various means such as street plays, poster competitions, Rangoli competitions, rallies etc.  A ‘Red Ribbon Club’ has also been established in the college under NSS. Under the leadership of Prof. Mokshada Naik, the college won the first position in the district level AIDS drama competition for three consecutive years.

Day by day, the society is seen to be addicted to various consumptions. Cancer caused by tobacco is a very important topic.  To address the issue, the NSS unit of the college is constantly trying to create awareness among the students on this topic.  The entire world was at a standstill during the Corona virus.  All educational institutions were closed.  Under the leadership of Dr. Ranjana Lad and Dr. Narendra Patil, health awareness was spread among the students through online programmes. Also during this Corona, the volunteers of the National Service Scheme prepared masks and distributed them to people from village to village. They also collected food grains and delivered it to the needy people during the lockdown.  Not only that, but many volunteers also worked as police warriors. During the Corona pandemic, Safe Grandparents campaign was conducted. NSS volunteers also actively participated in this campaign.

 Keeping in mind that ‘blood donation is the best donation’, blood donation camp is organized every year in the college.  This blood donation camp always gets spontaneous response from students and people of Warora city.

 Students are also guided on the importance of environment through various activities organized in the college.  The ‘Miyawaki’ project at Anandavan is widely known. On this line, tree plantation programs are celebrated with enthusiasm in the college from time to time. An innovative idea called ‘Adopt Tree Scheme’ was implemented in the college.  NSS students in the college are working on all three levels of tree plantation, tree cultivation and tree conservation.

 In accordance with the words of Reverend Baba Amte, ‘Shram Hi Shri Ram Hamara’, Shram Daan programmes are regularly conducted in the college and in the surrounding adopted villages to inculcate the importance of Shram (labour) among the students. Anandvan and Somnath are pilgrimage sites of social service and therefore special camps of National Service Scheme were conducted at Anandvan and Somnath.  From time to time, these camps imparted knowledge through intellectual session, importance of labour through daily Shram daan activity to the students. These camps became very important also for the personality development of the students.

 The special camp of the college held at Gram Panchayat, Tumgaon in the year 2023-24 was so remarkable.  In this camp, the response of the villagers was admirable. Engineer Bhau Thute’s kirtan, Anandavan Orchestra, Zhep Addiction Mukti Kendra’s program, college student Ashish Guymare’skirtan and the National Arts Team’s program, the villagers got to see the train in the cultural program.

 It is our social duty to render helping hand during the period of natural calamity.  Under the leadership of Dr.  Ranjana Lad and Dr.  Narendra Patil, the volunteers of National Service Scheme provided help to the flood victims of Sangli and Satara areas.  Apart from this, the people of the two flood affected villages of Pardgaon and Betala in Brahmapuri taluka were also given food grain and other necessary items.  A total of 60 families were given food grain kits.

The addiction of alcohol, cigarettes, tobacco, opium, hashish, ganja Is consuming the society.  In order to spread awareness and to make people realise the threats of addiction, a street play based on addiction was staged by the students of NSS.  This street play was written and directed by Prof. Mokshada Naik.  The same street play was also performed in the villages adopted by the college NSS unit. These days mobile phone addiction among young children is becoming very dangerous. This street play also shed light on this issue.

From time to time volunteers of National Service Scheme conduct cleanliness drive in the college and surrounding areas and in many villages.  A part of cleanliness is a plastic free environment. Rallies are also organized for plastic free environment.

 Voting is the responsibility of every citizen.  In order to make citizens aware of this responsibility, the volunteers of National Service Scheme conduct voting awareness campaign.

Various occasions and days are also regularly observed by the NSS unit.  8th September International Literacy Day, 24th September NSS Day, 2nd October Gandhi Jayanti, recognizing the importance of that day, programs are conducted in the college on behalf of the National Service Scheme.

 Students enthusiastically participate in various camps conducted by National Service Scheme.  Ms. Archana Todsam and Ms. Roshana Vadde, two students participated in the national camp held at Guwahati under the leadership of Dr. Ranjana Lad.

Ms. Nikita Manusmare also left her mark through the National Integration Camp and Prerna Camp.  Apart from this, in 2023-24 Mr. Rupesh Kuttarmare was selected for Utkarsh and Aavhan state level camps. Along with this Ms. Achal Chikte and Mr. Ashish manusmare also participated in Utkarsh state level camps.

Under the guidance of the Principal Dr. Mrinal Kale and under the leadership of the program officer and with the encouragement of the teachers and non-teaching staff of the college, Anandvan Parivar, the volunteers of the National Service Scheme are doing a great job in respect of community service.

राष्ट्रीय सेवा योजना (NSS)

 तरुणांच्या चैतन्यशील ऊर्जेला एक विधायक प्रेरणा देण्यासाठी भारत सरकारने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या स्मरणार्थ 2 ऑक्टोबर 1969 रोजी संपूर्ण भारतभर राष्ट्रीय सेवा योजनेची सुरवात केली.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे देशातील फार कमी पण भाग्यवान महाविद्यालयांपैकी आनंदनिकेतन हे असे महाविद्यालय आहे जिथे 1969 पासूनच राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात झाली.

 आनंदनिकेतन महाविद्यालय तर सामाजिक सेवेचा वसा असणारे महाविद्यालय.आणि याच सेवेची बीजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आजही आनंदनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जात आहेत.1985 सालचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट एकक पुरस्कार प्राप्त व नंतर 2006 मध्ये परत एकदा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त असलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयाचे पथक आजही तितक्याच जोमाने कार्यरत आहे. 2019 ते 2022 या तीन वर्षात कार्यक्रम अधिकारी डॉ.रंजना लाड, व डॉ.नरेंद्र पाटील व 2022 पासून प्रा.मोक्षदा नाईक व प्रा.सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये व आजूबाजूच्या गावांमध्ये यशस्वीरित्या राबवत आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयामध्ये,गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विषयक कार्यक्रम राबविले जातात.’एड्स’ या रोगाची भयानकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी,यासाठी या विषयावर पथनाट्य,पोस्टरस्पर्धा,रांगोळी स्पर्धा, रॅली अशा वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केल्या जाते. महाविद्यालयात NSS अंतर्गत ‘रेड रिबन क्लब’ ची देखील स्थापना करण्यात आली आहे.प्रा.मोक्षदा नाईक यांच्या नेतृत्वात सलग तीन वर्षे जिल्हास्तरावर एड्स पथनाट्य स्पर्धेत महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला.

दिवसेंदिवस समाज व्यसनांच्या आहारी जाताना दिसतो आहे.यात तंबाखू पासून होणारा कॅन्सर हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय. या अनुषंगाने या विषयावर आणि वेगवेगळ्या कॅन्सरवर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सातत्याने महाविद्यालयातील NSS युनिट करत असते. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग ठप्प पडले होते. अनेक महाविद्यालये बंद होती. डॉ.रंजना लाड व डॉ.नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात अशाही वेळेला ऑनलाइन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयावर जनजागृती केल्या गेली आणि याच कोरोनाच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मास्क तयार करणे व गावोगावी जाऊन त्यांचे वाटप करणे ,धान्य गोळा करून ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम लॉकडाऊन चे नियम पाळून केले.इतकेच नाही तर अनेक स्वयंसेवकांनी पोलीस योद्धा म्हणून देखील काम केले.याच कोरोना च्या काळात सुरक्षित आजी- आजोबा अभियान राबविले गेले.या अभियानातही NSS विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ ह्याची जाणीव ठेवून महाविद्यालयात दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते. या रक्तदान शिबिराला कायमच विद्यार्थ्यांचा व वरोरा गावातील लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो.

पर्यावरण हा विषय डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयात सातत्याने या विषयावर देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. आनंदवनातला ‘मियावाकी’ हा प्रकल्प तर सर्वदूर परिचित आहे, याच धर्तीवर महाविद्यालयात वेळोवेळी वृक्षारोपणाचे कार्यक्रम उत्साहात साजरे होतात.’दत्तक झाड योजना’अशी एक अभिनव कल्पना महाविद्यालयात राबवली गेली. वृक्षारोपण,वृक्ष लागवड ,वृक्ष संवर्धन या तीनही पातळ्यांवर महाविद्यालयातील NSS चे  विद्यार्थी काम करत असतात.

‘श्रम ही श्रीराम हमारा’ या श्रद्धेय बाबा आमटे यांच्या वाक्याला अनुसरून श्रमाचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावे म्हणून श्रमदानाचे कार्यक्रम महाविद्यालयात व आजूबाजूच्या दत्तक गावांमध्ये कायमच घेतले जातात.आनंदवन व सोमनाथ ही तर सामाजिक सेवेची तीर्थक्षेत्रे आणि म्हणूनच आनंदवन आणि सोमनाथ या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेची विशेष शिबीरे राबवल्या गेली.या शिबिरांमधून वेळोवेळी बौद्धिक सत्रातून ज्ञानाचे, श्रमदानातून श्रमाचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले गेले.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही शिबिरे अत्यंत महत्वपूर्ण ठरली.

         2023- 24 मध्ये ग्रामपंचायत तुमगाव या ठिकाणी झालेले महाविद्यालयाचे विशेष शिबिर असेच उल्लेखनीय ठरले. या शिबिरात गावकऱ्यांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता.इंजिनीयर भाऊ थुटे यांचे कीर्तन,आनंदवन आर्केस्ट्रा,झेप व्यसनमुक्ती केंद्रा तर्फे कार्यक्रम, महाविद्यालयाचा विद्यार्थी आशिष माणूसमारे याचे कीर्तन आणि राष्ट्रीय कलापथकाचे कार्यक्रम यांची रेलचेल सांस्कृतिक कार्यक्रमात गावकऱ्यांना पाहायला मिळाली.

 नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडात धावून जाणे हे तर आपले सामाजिक कर्तव्य.डॉ. रंजना लाड व डॉ. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात सांगली व सातारा या भागातील पूरग्रस्तांसाठी मदत पोहोचवण्याचे काम देखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले.या शिवाय ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त पारडगाव व बेटाळा या दोन गावातील लोकांनाही मदत पोहचवण्यात आली.एकूण 60 कुटुंबाना अन्नधान्य किट पोहचवली गेली.   दारू,सिगरेट,तंबाखू,अफू,चरस,गांजा या व्यसनांचा विळखा समाजाला गिळू पाहतो आहे. विद्यार्थ्यांना व समाजाला या व्यसनाची भयानकता लक्षात यावी म्हणून कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक यांचे लेखन व दिग्दर्शन असलेले व्यसनमुक्तीवर आधारित रासेयो च्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य बसवण्यात आले आणि महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या गावांमध्ये या पथनाट्याचे प्रयोगही  करण्यात आले.आजकाल तरुण मुलांमध्ये असणारे मोबाईलचे व्यसनही अत्यंत घातक होत चालले आहे.या  पथनाट्यातून या विषयावर देखील प्रकाश टाकण्यात आला.

वेळोवेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महाविद्यालयात व  महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात व अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवत असतात. स्वच्छतेचा एक भाग म्हणजे प्लास्टिक मुक्त पर्यावरण.याच प्लॅस्टिक मुक्त पर्यावरणासाठी रॅलीचे देखील आयोजन करण्यात येते.

 मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव नागरिकांमध्ये व्हावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे  स्वयंसेवक मतदान जनजागृती  अभियान राबवित असतात.

8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन, 24 सप्टेंबर NSS दिन,2 ऑक्टोबर गांधी जयंती अशा विविध प्रसंगी त्या त्या दिनाचे महत्त्व ओळखून त्या त्या दिवशी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आवर्जून कार्यक्रम घेतल्या जातात.

 राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शिबिरांमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत असतात. कु.अर्चना तोडसाम व कु.रोशना वड्डे या दोन विद्यार्थिनींनी  डॉ. रंजना लाड  यांच्या नेतृत्वात गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरात सहभाग नोंदवला . कु.निकिता माणूसमारे हिने देखील राष्ट्रीय इंटिग्रेशन कॅम्प व प्रेरणा शिबिरातून आपला वेगळा ठसा उमटवला. याशिवाय 2023- 24 मध्ये श्री रुपेश कुत्तरमारे याची आव्हान व उत्कर्ष या राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाली.सोबतच  कु.आचल चिकटे व श्री.आशिष माणूसमारे हे देखील उत्कर्ष या राज्यस्तरीय शिबिरांमध्ये  सहभागी झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनात व त्या त्या वर्षी कार्यरत असणारे कार्यक्रम अधिकारी यांच्या नेतृत्वात व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आनंदवन परिवार यांच्या प्रोत्साहनात राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक भरीव कामगिरी करत आहे आणि आजही सामुदायिक विकास व रचनात्मक कार्य डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना चे युनिट मार्गक्रमण करत आहे.

Gallery

First best NSS Unit Award was declared by Government of Maharashtra in the year 1995 and it was awarded to ANC.

The best NSS unit of the state award of 2006 declared by Government of Maharashtra And Dr. Avinash Pandhare, Assistant Professor, Dept. of English awarded the Best NSS Program Officer in the year 2006.

Blood Donation Camp

Health Awareness Camp

Tree Plantation

AIDS Awareness Programme

AIDS street Play -District Level first Prize and got 2nd Prize in 2023 

Cleanliness Drive

NSS Camp -Tumgav

श्रमदान